प्राथमिक शिक्षकांचा नेता सैरभैर

अहमदनगर ः जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे राजकारणात एकमेकांवर नेहमीच चिखलफेक केली जात आहे. ही चिखलफेक होत असताना पातळी सोडूनही अनेकदा होत आहे. गेल्या काही वर्षात सुरु झालेली शिक्षकांच्या राजकारणातील ही गलिच्छ परंपरा पुढे जात आहे. तिला ब्रेक लावणे गरजेचे आहे. 


पारनेरातील काही नेते ही परंपरा पुढे नेण्याचे काम करीत असल्याची टीकाच आता पारनेर तालुक्यातून होत आहे. तालुक्यातील एक नेता कोणी इतर संघटनांचा नेता प्रसिध्दीच्या झोतात येऊ लागला की तो टीकेच झोड उठवत असल्याची चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरु आहे. त्या शिक्षकाचे राजकारण गलिच्छ आहे, अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरु आहे.

शिक्षकाच्या राजकारण हे राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा भयंकर आहे. या राजकारणात एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्या जात आहे. हे राजकारण अलिकडच्या काळात उदयास आलेले आहे. त्याला काहीजण खतपाणी खालून ते कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांच्या काही नेत्यांकडून सुरु असलेले हे राजकारण थांबविण्याची मागणी होत आहे. परंतु ते थांबले जात नसल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. हे असेच सुरु राहिले तर आगामी शिक्षकांच्या नेतृत्वाने जुन्यांकडून काय आदर्श घ्यायचा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शिक्षक संघटनांच्या संघटना उदंड झालेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नेत्यांचे प्रमाण वाढले आहे. नेते जास्त व कार्यकर्ते कमी अशी म्हणण्याची वेळ आता शिक्षकांवर आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न आहे तसेच आहे. फक्त नेते प्रसिध्दी मिळवत आहेत. वास्तविक शिक्षकांचे प्रश्न कायमच तसे राहत आहेत. त्यामुळे शिक्षकांचाही आता चमकोगिरी करणाऱ्या नेत्यावर विश्वास राहिलेला नाही. परंतु चमकोगिरी करणारे कायमच प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत. अशा नेत्यांना अधिकाऱ्यांनीही दूर ठेवावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

मावा अन् तंबाखू खाऊन थुंकणारा नेता नको..
मावा अन् तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे शिक्षकांमध्ये काही नेते तयार झालेले आहेत. शिक्षकांचे नेतृत्व करणारे नेते निरव्यसनी असणे गरजेचे आहे. परंतु दिवसभर तंबाखू, गुटखा खाऊन रात्रीची पार्टी करणारे आता शिक्षकांचे नेतृत्व करीत आहेत. त्या झाकीतच ही मंडळी रात्रीच्या वेळी सोशल मीडियावर गप्पा मारीत असते. त्यातून त्यांचे वाद होत आहे. मात्र सकाळी तिच मंडळी ग्रुपमधील मेसेज डिलीट करून आपले काही झालेच नाही, असे सकाळी दाखवितात, अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरु आहे.

अधिकाऱ्यांनी खडासवून परत तेच वागणे
अधिकाऱ्यांना निवेदन देताना एक शिक्षक नेता मावा खाऊन अधिकाऱ्यांच्या दालनात गेला होता. माव्याचा वास आल्यानंतर त्या अधिकाऱ्याने त्या नेत्याला चांगलेच खडेबोल सुनावले होते. तरीही तो नेता निवेदन देताना मावा व तंबाखू खाऊनच अधिकाऱ्यांकडे जात असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post