संगमनेरला अवकाळी पावसाने दाणादाण... पिकाचे नुकसान मोठे नुकसान...

संगमनेर ः  संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ निमाज धांदरफळ नांदुरी दुमाला पेमगिरी कवठे धांदरफळ या गावांना अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाने शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कोठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या मालकीच्या दोन गाईवर वीज पडून त्या दगावल्या आहेत.



संगमनेर शहर आणि तालुक्याला  दुपारी साडेतीन पासून ते पाच वाजेपर्यंत जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते आणि काढणीला आलेला गहू कांदा काही पिकांचे नुकसान झाले

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे दिवसभर कडक ऊन पडते आणि पहाटे च्या वेळी थंडी जाणवते अशातच गेली दोन ते तीन दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत होता पावसाचे वातावरण तयार झाले होते.

बुधवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले अन विजेचा कडकडाट होऊन जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली या पावसाने सर्वांचीच धांदल उडाली 

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावाला या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले तर या अवकाळी पावसाने  शेत पाण्याने तुडुंब भरून गेले,ओढे नाले तसेच डोंगर कडेही काही वेळ जोरात वाहू लागले. 

पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने काढणीस आलेले गहू,उन्हाळी बाजरी,हरभरा ,कांदे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून इतर जीवित हानीची  प्राथमिक माहिती प्राप्त झालेली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post