जय अन् पराजयाशिवाय मजाच नाही. कधी तरी जिंकायचं असतं. एकदा जिंकल की वारंवार जिंकवाचं वाटतं. पण कधी तरी शेरास सव्वाशेर मिळत असतो. तेव्हा पराजय झाला की मगं तो मोठ्या मनाने स्वीकारून जिंकणाऱ्याचे अभिनंदन करून त्याला त्याची पुढील वाटचाल चालू द्यायची असते. अन् आपला पराजय का झाला याची कारणे शोधून त्यावर मार्गक्रम करणे गरजेचे आहे.
लोकसभा अन् विधानसभा निवडणुकात काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये रथी-महारथींना पराभावाची चव चाखण्याची वेळ आलेली आहे. या पराजयाच्या धक्क्यातून काहीजण अद्याप सावरलेले नाहीत. काहीजण अजूनही सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काहीजण सावरून समोरच्या विजेत्याला अडचणी कशा निर्माण होतील याचे डावपेच टाकण्यात सध्या धन्यता मानत आहेत.
हा सर्व प्रकार जिल्ह्यातील राजकारणात सुरु आहे. निवडणुकातील जय पराजय हा नेत्याच्या कामे व त्याच्या कर्तृत्वाचा भाग आहे. उमेदवार व त्याने केलेले कामे पाहूनच मतदार त्याला मतदान करीत असतात. या वेळी अनेक वर्षांचे चेहरे मतदार नाकारून नव्याला संधी देण्याचा प्रयत्न करीत असतात. तसाच काहीसा प्रकार विधानसभा निवडणुकीत झालेला आहे.जिल्ह्यातील काही जागांचे निकालही धक्कादायक लागलेले आहेत. या धक्क्यात ते उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते व समर्थक अद्याप बाहेर आलेले नाहीत. पराजय झाल्याचे त्यांना मान्यच नसल्याचे ते दाखवत असून तेच आमदार असल्याचे भासवित आहेत.
सध्या जिल्ह्यातील राजकारणात काहींचा पराजय झालेला आहे. त्या पराजयातून ते सावरलेले नसून काहीजणांना तो पराजयचं मान्य नसून ते विजेत्याला त्याचं काम करून देण्यात अडचणीत आणतं आहेत. पराजय गरजेचे आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील आलाचं पाहिजे. परंतु आपल्याकडे आता सर्वच क्षेत्रात जिंकता यायला लागलं की पराजय स्वीकारता येत नाही. विजयी झालेल्या उमेदवाराला ते पराभूत समजत असून जनतेची कामे आपणच करीत असल्याचे भासवित आहेत.
विजयी उमेदवार नवजात बालक सारखेच असते. जसे बाळ जन्माला आल्यानंतर त्याला काही दिवस रांगायला चालायला अन् पळायला वेळ लागतो. तसाच नवीन आमदारांनाही मतदारसंघात कामे करण्यासाठी वेळ लागतो. सुरवातीचे काहीजण दिवस मतदारसंघाची माहिती घेऊन ते पुढे कामकाज करीत असतात. हे कामकाज करताना चुका होतात, त्याच चुकांचे सध्या पराभूत उमेदवारांकडून भांडवल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो.
आरोप-प्रत्यारोप करून नवनियुक्तांना विकास कामांपासून दूर ठेवण्याचा कुटील डाव सध्या जिल्ह्यात टाकला जात आहे. यावरून मतदारसंघातील मतदारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तुम्हाला संधी दिली होती. तेव्हा तुम्ही काय काम केली तपासून पहा.. आता त्यांना संधी दिली, त्यांना काम करून द्या.. नाही झाले कामे तर तुम्हाला संधीच मिळणार आहे. त्यामुळे काही दिवस सबुरी घ्या, असेच आता मतदार म्हणू लागलेले आहे.
मतदारांचे बोल नेत्यांपर्यंत पोहचत आहेत. परंतु नेत्या भोवती असलेली चांडाळचौकडी त्यांना विचार करून द्यायला वेळ देत नसल्याने नेत्यांकडून त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा होत असून नेताच सध्या ट्रोल होऊनही साहेब आपल्यालाच वातावरण आहे. त्यांना काही समजत नाही.. जनता आपल्या मागेच असल्याचे भासवून नेत्याला फसविण्याचा प्रयत्न काही मतदारसंघात सुरु आहे.
नेतेही पुढे-पुढे करणाऱ्यांचे ऐकून स्वतःची विचार बासनात ठेऊन दुसऱ्यांच्या विचारावर काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्याऐवजी मतदारांच्या रोषालाच बळी जावे लागत आहे. विधानसभेतील पराभवातील चुका शोधून पुढे जाण्याऐवजी नेते सध्या विद्यमानांना काम न करण्यासाठी राजकीय डावपेच टाकून आपण किती मुरब्बी आहोत हे दाखवून देत आहेत.
Post a Comment