नगरच्या मेडिकल कॉलेजसाठी समितीची नियुक्ती खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश : जागा पाहण्याचे समितीला निर्देश

अहिल्यानगर : राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठ्या असलेल्या लोकसभेच्या नगर दक्षिण मतदार संघात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करावे या खासदार नीलेश लंके यांच्या मागणीस यश आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने नगर जिल्ह्यात हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. या महाविद्यालयासाठी जागेचा शोध घेण्यासंदर्भात समितीस सुचना देण्यात आल्या आहेत. खासदार नीलेश लंके यांनी ही माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post