संगमनेरमध्ये शिक्षणाच्या चांगल्या सुविधा...

संगमनेर : ः लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामध्ये शिक्षणासह अत्यंत चांगल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात आले आहे. आज या मेळाव्यात जिल्हाभरातून सात हजार पेक्षा जास्त युवक आले आहे. त्या सर्वांना नोकरी मिळून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने चांगली मानसिकता ठेवावी. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले. 


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोकचळवळीच्या वतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये झालेल्या आय लव संगमनेर चळवळ अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात आज जिल्हाभरातून 7290 तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यासाठी आलेल्या 91 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून 2019 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. 
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डाॅ. जयश्री थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदी उपस्थित होते.

ज्या विद्यार्थ्यांची निवड होणार नाही त्यांच्याकरता प्रशिक्षण देऊन पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न केले. जातील यापुढील काळातही जगभरातील विविध कंपन्या संगमनेर मध्ये आणून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संधी उपलब्ध करून दिली जाईल असे ते म्हणाले.

टीसीएस टाटा महिंद्रा अँड महिंद्रा अशा विविध 91 कंपन्यांमधून 2019 विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे. या मेळाव्यासाठी बी ए, बी कॉम, बीएससी, इंजीनियरिंग, फार्मसी, आयटीआय, डिप्लोमा अशा विविध क्षेत्रांमधील 7290 विद्यार्थी उपस्थित होते. यापुढील काळात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत केला जाईल असे आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post