शिर्डीत कूपनावरच भाविकांना महाप्रसादाचा लाभ...

अहिल्यानगर : शिर्डी संस्थानतर्फे सुरू असलेल्या अन्नछत्राच्या मोफत जेवणाविषयी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे आता जेवणासाठी कूपन बंधनकारक करण्यात आले आहे. कूपन असेल तरच भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानने निर्णय घेतला आहे.  


या आधी शिर्डीतील प्रसादालयातील मोफत जेवणासाठी थेट प्रवेश देण्यात येत होता. यापुढे त्यात बदल होणार असून जेवणासाठी कुपन आवश्यक असणार आहे. हे कुपन मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुक्ल आकारले जाणार नाही. सहा फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.  

शिर्डी संस्थानच्या प्रसादालयातील जेवणासाठी त्याच ठिकाणी कूपन उपलब्ध केले जाणार आहेत. त्याचसोबत साई संस्थानच्या भक्त निवासात देखील हे कूपन देण्यात येणार आहेत.  

शिर्डीमध्ये नुकतेच दुहेरी हत्याकांड घडले आहे. त्यामध्ये संस्थानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

या आधी माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीतील मोफत जेवणावर टीका केली होती. शिर्डी संस्थानातील मोफत जेवणामुळे सगळ्या देशातील भिकारी शिर्डीमध्ये जमा होतात असं वक्तव्य त्यांनी केले होते. 

गुन्हेगारीमध्ये वाढ होऊन शिर्डीकरांची सुरक्षा धोक्यात येते असेही ते म्हणाले होते. त्यामुळे शिर्डी संस्थानाने मोफत जेवण न देता 25 रुपयांमध्ये जेवण द्यावे, अशी मागणी सुजय विखे यांनी केली होती.  

सुजय विखे यांच्या या मागणीवरून सर्व स्तरातून जोरदार टीका सुरू झाली. त्यानंतरही सुजय विखे हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम होते. आता शिर्डी संस्थानने घेतलेल्या कूपनासंबंधित निर्णयामागे सुजय विखेंची मागणी असल्याचे बोलले जात आहे. 

संस्थानने घेतलेल्या निर्णयावर सर्वच स्थरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कूपनावर महाप्रसादाचा लाभ स्कीम बंद करण्याची मागणी होत आहे.  लोक अन्नछत्र घालतात. अन्नछत्र घातल्यानंतर तेथे काय गुन्हेगारी वाढती काय असा सवाल केला जात आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post