आजकाल प्लॅस्टिक सर्वत्र वापरले जाते. ते आपल्याला आरामदायक व सोयीचे वाटते, पण त्याचे पर्यावरणावर हानिकारक परिणाम होतात. प्लॅस्टिक कचरा सडत नाही, व तो हजारो वर्षे पृथ्वीवर तसाच राहतो. यामुळे पर्यावरणाची हानी होण्यासोबतच वन्यजीव, जलस्रोत व माणसांच्या आरोग्यावरही त्यांचे गंभीर परिणाम होण्याची बीती आहे. म्हणूनच प्लॅस्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे.
प्लॅस्टिक कचरा हा सडत नाही. जेव्हा तो कचरा जमिनीवर फेकला जातो, तेव्हा तो हजारो वर्षे तिथेच राहतो. यामुळे मातीचे प्रदूषण होऊन, जलस्रोतही दूषित होतात. आज देशातील अनेक जलस्त्रोतात कचरा साठलेला दिसून येत आहे.
वन्यजीव आणि समुद्री प्राणी प्लॅस्टिकचा समावेश खाद्य म्हणून करतात. त्यामुळे त्यांचे पचनप्रणालीच्या मृत्यूच्या घटनात वाढ झालेली आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. प्लॅस्टिकचा अत्यधिक वापर वणि कचरा यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो.
प्राणी, पक्षी व जलचर आदी पाणी आणि जमिनीत फेकलेला प्लॅस्टिक खाण्याच्या प्रयत्नात अडकतात, जो त्यांच्यासाठी जीवघेणा ठरतो. अनेक जनावरांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्याचे उघड झालेले आहे. तशा घटना घडत असून या पुढे घडत राहणार आहे. या घटना टाळायच्या असतील तर त्यासाठी प्रत्येकाने प्लॅस्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे.
बाजारात विविध इको-फ्रेंडली पर्याय उपलब्ध आहेत. कपड्याचे, कागदी किंवा धातूचे पिशवी वापरणे. पाणी पिऊन बाटल्या आणि एकदाच वापरणारे प्लॅस्टिक बदलून पुनर्वापरायोग्य बाटल्या वापरणे हे एक उत्तम पर्याय ठरू शकतो. रोजच्या जीवनातील विविध वस्तू, जसे की प्लॅस्टिक पिशव्या, स्ट्रॉ, डिस्पोजेबल प्लेट्स, कप आणि चष्मे यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करणए गरजेचे आहे.
लोकांमध्ये प्लॅस्टिकच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा यावर व्याख्यानांचे आयोजन करणे महत्वाचे ठरणार आहे. प्रत्येकाने आपले योगदान देण्यासाठी प्लॅस्टिक वापर कमी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून गावा-गावात प्रबोधन होणे गरजेचे आहे.
प्लॅस्टिकचा वापर कमी करणे हे आपल्यासमोर असलेल्या सर्वात मोठ्या पर्यावरणीय आव्हानांपैकी एक आहे. प्लॅस्टिकची हानी टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने छोट्या छोट्या बदलांचा अवलंब करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संरक्षण हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्लॅस्टिक वापर कमी करणे हा एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे निसर्ग व मानवता दोन्हीचे संरक्षण होईल. यासाठी आता लोकांना उपदेश करून उपयोग होणार नाही, प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
Post a Comment