अहिल्यानगर ः प्राथमिक शिक्षकांच्या एका संघटनेत नाराजीचे नाट्य सुरु आहे. राज्याचे पद न मिळाल्याने शिक्षक नेते नाराज झालेले आहे. .या नाराजीतून त्या नेत्याने सर्वच शिक्षकांच्या ग्रुपमधून लेफ्ट होणे पसंत केलेले आहे. त्यांच्या लेफ्ट होण्याच्या प्रकारामुळे जिल्हाभर याबाबत चर्चा सुरु झालेली आहे.
शिक्षकांच्या एका संघटनेत एका नेत्याला राज्याचे पद मिळेल, अशी आशा होती. त्यासाठी त्या नेत्याने डावपेच टाकले होते. त्या नेत्याबरोबरच इतरांनाही आपल्यालच संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. या दोन्ही नेत्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेलेले आहे.
यामुळे नाराज झालेल्या त्या नेत्याने आपली नाराजी इतर नेत्यांजवळ व्यक्त केलेली आहे. आपण संघटनेसाठी रात्रंदिवस काम करतो, परंतु आपल्याला जर डावलले जात असेल तर वेगळा निर्णय घ्यावा, लागेल, असे त्या नेत्याने आपले मत मांडलेले आहे. त्यावर इतर नेत्यांनी सबुरीने घ्या असा त्या शिक्षक नेत्याला दिलेला आहे.
संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असलेल्या त्या शिक्षक नेत्याने शिक्षकांच्या व त्या संघटनेच्या ग्रुपमधून बाहेर पडण्यात धन्यता मानली आहे. ते ग्रुपमधून बाहेर पडल्याने त्या संघटनेतील काही नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण झालेले आहे. बर झाले स्वतः हून गेले. नाही तर आपल्याला काढावे लागले असते, अशीही प्रतिक्रिया काहीजण व्यक्त करीत आहेत.
या नाराजीचा परिणाम शिक्षक बॅंकेच्या राजकारणावर होणार आहे. ही नाराजी शिक्षक बॅंकेत तिसरा गट तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेत्यांची संचालकांची एकजूट ठेवण्यासाठी कसरत सुरु झालेली आहे. तो नेता बॅंकेत सत्तांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
ही चर्चा सध्या जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरु आहे. या चर्चेने सध्या जिल्ह्यात वेग घेतलेला आहे. तो नेता कोण याबाबत प्रत्येकजण एकमेकाला विचारीत आहेत. परंतु ठोस कोणाचेच नाव पुढे येत नाही. ग्रुपमधून कोण कोण बाहेर पडले, याचाही शोध काहीजण घेत आहेत.
Post a Comment