अहिल्यानगर ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसह ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची हजेरी क्यूआरकोडने करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी घेतलेला आहे. या निर्णयाला सर्वांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे हा निर्णय स्थगित होऊ शकतो, अशी चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरु आहे. क्यूआरकोडऐवजी बायोमॅट्रीकचा पर्याय पुढे येऊ शकतो, अशीच चर्चा सध्या जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरु आहे. यावर आता काही शिक्षकांनी पैजा लावल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बायोमॅट्रीक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यास शिक्षकांसह ग्रामसेवकांनी विरोध केलेला आहे. या विरोधात समन्वय समितीची स्थापन करून ती या प्रश्नावर लढा देत आहे. ज्यांनी क्यूआरकोड नुसार हजेरी दिलेली नाही. त्यांचे पगार थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. हा निर्णय योग्य व अयोग्य असल्याची मते सध्या शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.
इमाने इतबारे काम करणाऱ्यांना क्यूआरकोडने हजेरी घ्या किंवा फेसरिडिंग ने घ्या त्यांना कुठलाच फरक पडणार नाही. मात्र जे नेते म्हणून मिरवतात, अधिकाऱ्यांच्या मागेपुढे करीत राहतात, त्यांना क्यूआरकोड हजेरीचा त्रास होणार आहे, अशीच चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह ग्रामसेवकांमध्ये सुरु आहे.
हीच परिस्थिती ग्रामसेवकांमध्ये आहे. ग्रामसेवकांमधील काही मंडळी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांबरोबर फिरत असून ते नियुक्तीच्या ठिकाणी कधीच नसतात, अशी तक्रार अनेक गावातून झालेली आहे. परंतु संबंधित ग्रामसेवक हे अधिकाऱ्यांबरोबर राहत असल्याने त्यांची चौकशी होत नसल्याची चर्चा सध्या ग्रामसेवकांमध्ये सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने क्यूआरकोड हजेरीचा निर्णय लागूच करावा, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक शाळेच्या वेळेत शाळेत उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सादर झालेल्या आहेत. त्या तक्रारींची चौकशी करून संबंधित शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु शिक्षण विभाग तशी भूमिका घेत नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपध्दतीवरच आता शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तरी चालेल पण शिक्षकांचा रोष नको म्हणून शिक्षण विभागातील अधिकारी कार्यवाही करीत नसल्याची चर्चा सध्या शिक्षकांमधून सुरु आहे. विशेष म्हणजे प्रशासक राज येऊ तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु प्रशासक राज काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकाच वेळी अनेक शाळांना भेटी केल्याच्या घटना घडलेल्या नाहीत.
तसेच त्यांनी अधिकारी व कर्मचारी पाठवून सर्वच शाळांना भेटी दिलेल्या नाही. हा एकाच वेळी जिल्ह्यातील सर्वच शाळांची तपासणी करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतल्यास अनेक प्रकार उघड होतील, अशी चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरु आहे.
Post a Comment