बीड ः सरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन बीडमध्ये तणाव आहे. लोकप्रतिनिधींकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याप्रकरणी अटकेतील आरोपी हे धनंजय मुंडे यांचे जवळचे आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हेही त्यांचे निकटर्तीय असल्याचे सांगण्यात येते.
त्यातच बीडमधील दहशत व गुंडगिरीला धनंजय मुंडे जबाबदार आहे. कृषिमंत्री असतानाही त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत कृषी खात्यात कसा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला हे माध्यमांसमोर मांडले. त्यानंतर, धनंजय मुंडे यांनी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला होता.
यासंदर्भातील एका प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मी असतो तर नैतिकता जपत राजीनामा दिला असता, असे म्हटले. त्यावरुन, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रताप सरनाईक यांचे कौतूक करत धनंजय मुंडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातील प्रश्नावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका जाहीर करत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे असे म्हटले.
Post a Comment