अहिल्यानगर ः महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी ठराव करून पाणी पट्टी दरवाढ केली आहे. ही दरवाढ नागरिकांवर अन्याय करणारी आहे असे युवा नेते नितीन भुतारे यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका बाजूला शहरात कल्याण रोड, सारसनगर, केडगाव, अशा अनेक भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी येते .पूर्ण पाणी २४ तास नागरिकांना मिळत नाही. १५ वर्षापासून सुरू असलेली फेज टु योजनेचे काम अपूर्ण आहे. शहरात अनेक भागात टँकर द्वारे पाणीपुरवठा होतो हे सर्व असताना कोणत्या प्रकारे पाणी पट्टी दरवाढ आयुक्तांनी केली हे समजण्या पलीकडे आहे, असे भुतारे .यांनी म्हटले आहे.
पाणी पट्टी दरवाढ वाढवून पैसे जमा करायचे आणि पाणी पुरवठा लाईनवर देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करायचा असे अनेक दिवसापासून अहिल्या नगर महानगर पालिकेत सुरू आहे.असा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे.
हे सर्व निर्णय अहिल्यानगर पालिकेचे आयुक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी घेतात व त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवितात हे निर्णय घेताना शहरातील जनतेला व्यवस्थित, सुरळीत, दररोज पाणी मिळते का? हे पाहणे गरजेचे आहे हे कुठे त्यांनी पाहिले नाही व पाणी पट्टी दरवाढ केली अशी दरवाढ जनतेला मंजूर नाही.अशा प्रकारे काम करणारे आयुक्त जर अहिल्यानगर महानगर पालिकेत असतील तर अशा आयुक्तांना हटविण्याची गरज असून आजपासून नितीन भुतारे यांनी आयुक्त हटवा हे आंदोलन सुरू केले आहे.
त्या माध्यमातून त्यांनी नगरकरांना आवाहन केले आहे की जनतेवर अन्याय कारक निर्णय लादणारे आयुक्त या महानगरपालिकेत नको ठेकेदारांना पोसणाऱ्या आयुक्तांना हटवा व नवीन कार्यक्षम आयुक्तांची या अहिल्यानगर महानगर पालिकेत नियुक्ती करा असा मजकूर नगरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना cm@maharashtra.gov.in या मेल आयडी वर पाठवून मुख्यमंत्री यांना आयुक्त हटवा मागणी करा तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेने जी पाणीपट्टी दरवाढ केली ती रद्द करा अशी मागणी सर्व नगराच्या जनतेने करून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते नितीन भुतारे यांनी केले आहे.
Post a Comment