विभागीय आयुक्त प्राथमिक शिक्षकांच्या बायोमेट्रिक हजेरी साठी अनुकूल... शिक्षकांचे रोखलेले वेतन दोन दिवसात अदा करणे कामी निर्देश मिळणार...

नाशिक : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम  व उपआयुक्त उज्वला बावके  यांची भेट घेऊन क्यूआरकोड उपस्थितीबाबत असलेल्या विरोधा बाबत निवेदन देण्यात आले आहे.


यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले व राजेंद्र निमसे यांच्यासोबत ग्रामसेवक संघटनेचे सुनिल नागरे उपस्थित होते.

यावेळी ग्रामसेवक संघटना व शिक्षण संघटनांच्या वतीने बायोमेट्रिक प्रणालीला सकारात्मकतेने प्रतिसाद द्यावा व रोखलेले वेतन अदा करणे संबंधी येत्या २ दिवसात निर्णय घेतो , असे गेडाम यांनी सांगितले. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीत आपल्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटना यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले, असे ते राजेंद्र निमसे यांनी सांगितले.

मागील महिन्याच्या पगाराबाबतही योग्य मार्ग काढावा असे रोहोकले गुरूजी यांनी विनंती केली. तसे आश्वासनही त्यांनी दिले आहे, अशी माहिती राजेंद्र निमसे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post