झेडपी कर्मचार्यांचा अजबच कारभार... कार्यालयीन वेळ पावणे दहाला अन् काहींची हजेरी सव्वा आठला....

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर येऊ लागलेला आहे. त्यायतल्या त्यात बांधकाममधील गमती जमतीची खमंग चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.


प्रशासक राज काळात जिल्हा परिषदेतील नाठाळांना शिस्त लागेल अशी अपेक्षा होती. मात्र या  नाठाळांनी प्रशासकांना गुंडाळून टाकले असल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये सुरू आहे.

काही नाठाळ कर्मचारी कार्यालयीन वेळ पावणे दहा वाजता असताना सकाळीच सव्वा आठला येऊन हजेरी लावून घरी जात आहे. हा प्रकार गेल्या काही  दिवसापासून सुरू असल्याची चर्चा बांधकाम व जलजीवन विभागातील कर्मचार्यांमध्ये आहे.

सव्वा आठला हजेरी लावणारे कर्मचारी निवांत अकरा व बारा वाजता कार्यालयात कामावर येत आहे. हा प्रकार सर्वश्रूत असूनही प्रशासन कार्यवाहीच काहीच करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मागील सहा महिन्यातील हजेरी तपासल्यानंतर सत्यसमोर येईल अशी चर्चा सध्या कर्मचार्यांमध्ये सुरू आहे. या प्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लक्ष घालून त्या कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

विशेष म्हणजे कार्यालय जर साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान उघडले जाते. मग कर्मचारी कार्यालयात सव्वा आठला कसे येतात असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार सकाळी सहाला उघडले जात असून महसूल, पोलिस व इतर प्रशासनातील कर्मचार्यांची वाहने पार्किंग केली जात आहे. त्यातच काहीजण लवकर येऊन हजेरी लावून घरी जात आहे. त्यामुळे प्रवेशद्वारच सकाळी साडेनऊला उघडावे अशी मागणी कर्मचार्यांमधून होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post