रस्त्यासाठी आढळगावमध्ये उपोषण...


श्रीगोंदे : राष्ट्रीय महामार्ग 548 डी चे काम आढळगाव परिसरात संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे काम तातडीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे.


श्रीगोंदे - जामखेड रस्त्यावरील आढळगाव हे महत्वाचे गाव आहे. या गावाशी आजूबाजूच्या सात गावाचा नित्य संपर्क आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. दोन महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर काम सुरू झाले मात्र दोन दिवसात हे काम बंद पडले. 

जवळपास एक किलोमीटर रस्ता उकरून ठेवल्याने उडणाऱ्या धुळीचा त्रास नागरिकांना सुरू झाला. रस्त्यासाठी लागणारा मुरुम उपसा करण्यासाठी जी रॉयल्टी भरावी लागते त्याची परवानगी मिळत नसल्याचे कारण देत संबधित कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 

दोन महिन्यावर आढळगाव चे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा आहे. त्या पुर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.   मात्र काम सुरू करण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने सरपंच उबाळे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. 

त्यानंतर एक पोकलेन मशीन व दोन टिपरने मुरुम भरण्यास सुरुवात झाली. मात्र हे काम एकदम संथ गतीने आहे. आज सकाळपासून सरपंच उबाळे यानी उपोषण सुरू केले आहे. 

आज सूर करण्यात आलेल्या उपोषणास सुभाषलाल गांधी , हनुमंत गिरमकर,  बबन गव्हाणे, अंबादास चव्हाण, हनुमंत डोके, विलासराव भैलुमे, रामदास झेंडे, तुकाराम वाकडे, सागर वाकडे, सत्यवान शिंदे,अमोल डाळिंबे, डॉ डाळिंबे, डोके गुरुजी , शहाजी वाकडे,बबन काळे ,बंडू वाकडे, संतोष सोनवणे ,अल्फा शिंदे , दिपक भालेराव ,नाना बोळगे,माऊली काळे , पोपट छत्तीसे, महेश चव्हाण, सुभाष शिंदे यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला.

राष्ट्रीय महामार्गाचे काम होणे गरजेचे आहे. संबधीत ठेकेदार हे काम  जाणीव पूर्वक टाळाटाळ करत आहे.  हे काम युद्धपातळीवर सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. 

माजी सभापती विलास भैलुमे म्हणाले, धुळीमुळे लोकाना त्रास सहन करावा लागत आहे. काम तातडीने सुरू करून ते पूर्ण करणे गरजेचे आहे. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post