.अकोले : लिपीक कर्मचार्यांच्या वेतनातील त्रृटी प्रश्न मार्गी लावण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय व निमशासकीय लिपीक कर्मचारी संघाच्यावतीने आमदार डॉ. किरण लहामटे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अकोले पंचायत समिती येथे आमदार किरण लहामटे आले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय संघाच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रलंबित चौथ्या वेतन आयोग त्रुटी दूर करण्याबाबत निवेदन त्यांना देण्यात आले.
यावेळेस कक्ष अधिकारी कैलास येलमामे साहेब, शिवराम डगळे कैलास डावरे, राजेंद्र भोर, जगन्नाथ कचरे, दौलत नवले, दीपक वंडेकर,जगदीश पवार, सुनील मोहटे, दीपक जोशी, अलका पवार मॅडम, वेडे, दराडे, वायळ, काटकर यांच्यासह इतर लिपिक वर्गीय कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment