शासनाच्या संचमान्यतेच्या नवीन आदेशामुळे सरकारी शाळांचे अस्तित्व धोक्यात... अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ आंदोलनाच्या पावित्र्यात

अहिल्यानगरः  राज्याच्या शिक्षण संचालकांनी केलेल्या नवीन संचमान्यतेनुसार प्राथमिक शाळांतील हजारो विषय शिक्षक अतिरिक्त होत आहेत.यामुळे सरकारी शाळांवर मोठे संकट आले असून या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 


संचमान्यतेत दुरुस्ती न केल्यास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आंदोलनाच्या पावित्र्यात असून प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संयुक्तचिटणीस राजेंद्र निमसे यांनी दिला आहे.

शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेल्या संचमान्यतेच्या सुधारित आदेशानुसार राज्याच्या शिक्षण संचालकांनी सन २०२४-२५ या वर्षाची संचमान्यता अंतिम करण्यापूर्वी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला तपासणीसाठी उपलब्ध करून दिली आहे.

या संचमान्यतेनुसार २० पेक्षा कमी पट असलेल्या सहावी ते आठवीच्या वर्गांना शून्य शिक्षक दाखविले आहेत. त्यामुळे या वर्गासाठी अध्यापन करणारे हजारो विषय शिक्षक राज्यात अतिरिक्त होणार आहेत.

आधारकार्ड आधारित संचमान्यता केल्याने विद्यार्थी संख्या असूनही काही शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. संच मान्यतेच्या सुधारित आदेशाला विरोध करण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने राज्याचे शिक्षणमंत्री , शिक्षण सचिव आदिना निवेदन देवून संचमान्यते दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

संचमान्यतेच्या नवीन आदेशानुसार पूर्वी ६१ विद्यार्थी संख्येला तीन शिक्षक पदे मंजूर होती ;आता ७६ विद्यार्थी संख्येची अट ठेवली आहे. ९१ विद्यार्थी संख्येला चार शिक्षक मंजूर होते. आता१०६ विद्यार्थी संख्या लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या वर्गांना अध्यापन करणारे शिक्षकांना विद्यार्थी संख्येचा फटका बसणार आहे.

शिक्षण अधिकार कायद्याचे उल्लंघन या संचमान्यतेत होत असल्याचा आरोप केला असून सदरील संचमान्यतेचा आदेश रद्द करुन संचमान्यतेचे जुनेच निकष कायम ठेवण्याची मागणी राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , राज्य संयुक्तचिटणीस राजेंद्र निमसे, राज्यसंघटक बाळासाहेब कदम , संघाचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर,जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे , ऐक्य मंडळ जिल्हाध्यक्ष प्रदिप चक्रनारायण, सुरेश नवले, रामप्रसाद आव्हाड, शिवाजी ढाकणे, सुधीर बो-हाडे,विष्णू बांगर , संजय शेळके , संदीप  भालेराव ,रज्जाक सय्यद ,  सुधीर रणदिवे , मधुकर डहाळे , विलास लवांडे , महेश लोखंडे , ज्ञानदेव कराड , प्रकाश पटेकर , लाजरस कसोटे,भाऊसाहेब घोरपडे , नितीन थोरात,बजरंग बांदल,संगीता   निमसे ,अनिता उदबत्ते,मनिषा क्षेत्रे , संगीता निगळे  पांडुरंग देवकर ,संतोष  ठाणगे , रवींद्र अनाप ,संजय सोनवणे ,जनार्दन काळे , ज्ञानदेव कराड, प्रताप कदम , बथूवेल हिवाळे ,उद्धव डमाळे  ,नंदू गायकवाड , शिवाजी माने ,सुखदेव डेंगळे , बंडू नागरगोजे ,लक्ष्मण जटाडे , बबन  देशमुख ,राजेंद्र सोनवणे , शहाजी जरे, प्रदीप कांबळे , विनायक गोरे , अशोक दहिफळे , प्रविण शेळके ,रविंद्र दरेकर ,संजय कांबळे ,भारत शिरसाट,संदिप काळे ,  संजय थोरात , भाऊसाहेब घोरपडे , सर्जेराव ससाणेआदिनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post