संगमनेर : शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेस उपमुख्याध्यापकाने पगार कपातीवरुन लक्ष्य करीत पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धमकी दिली आहे. मुख्याध्यापिकेने संगमनेर शहर पोलिसांत धाव घेतले. सर्व प्रकार पोलिसांना सांगिता. त्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्यास प्रतिबंधात्मक कारवाई करीत अटक केली आहे.
सुखदेव संपत हासे (रा. राजापूर) हा शिक्षक शहरातील एका शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. नेहमीच मनमानी करत असल्याने त्याचा पंचायत समितीच्या शिक्षणाधिकार्यांनी पगार कापला.
यावरुन चिडचिड झाल्याने त्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेस अन्य चार-पाच शिक्षकांसह अडवून दमबाजी केली. तुम्ही माझा पगार दिला नाही तर मी शाळेच्या गेटमध्येच पेट्रोल टाकून जाळील, तुम्हाला शाळेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी धमकी दिली.
या सततच्या त्रासाला वैतागून मुख्याध्यापिकेने शहर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्याने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
मात्र, त्याच्यावर हा तिसरा अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत अटक केली आहे. या घटनेने शिक्षण वर्तुळात एकच उडाली आहे.
Post a Comment