राहुरी : तालुक्यातील चिंचोली फाटा येथे एका तरुणाने पत्नीशी झालेल्या वादाच्या कारणावरुन गावठी कट्ट्यातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना ही बुधवार ( ता. 26) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. सोमनाथ रामभाऊ वाकचौरे, वय 32 वर्षे, हा कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवाशी आहे. सोमनाथ वाकचौरे याचे त्याच्या पत्नीशी नेहमीच वाद होत असल्याने त्याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहत होती.
वाकचौरे हा चिंचोली फाटा येथे आला होता. त्याने पत्नीशी वाद करुन मारहाण व दमबाजी केली होती. याबाबत काल 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी वाकचौरे याच्या पत्नीने सोमनाथ याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती.
त्यानंतर सोमनाथ वाकचौरे याने दुपारी दीड वाजे दरम्यान या कारणावरुन चिंचोली फाट्या जवळील भंडारदरा उजव्या कालव्या लगत गावठी कट्ट्यातून स्वतःच्या हनुवटीच्या खाली गोळी झाडून घेतली.
गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक त्याच्या जवळ गेले. तेव्हा सोमनाथ हा गंभीर जखमी झालेला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, हवालदार सोमनाथ जायभाय, सतिष आवारे, राहुव यादव, अंकूश भोसले आदी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस पथकाने गावठी कट्टा जप्त करुन जखमी सोमनाथ रामभाऊ वाकचौरे याला ताब्यात घेऊन लोणी येथील रुग्णालयात दाखल केले.
Post a Comment