शासकीय निमशासकीय लिपीक संघाचे सभापती शिंदेंना साकडे

कर्जत  :  लिपीक कर्मचार्यांच्या वेतनातील त्रृटी प्रश्न मार्गी लावण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय व निमशासकीय लिपीक कर्मचारी संघाच्यावतीने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


सभापती राम शिंदे हे कर्जत तालुका दौर्यावर आले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय संघाच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी  प्रलंबित चौथ्या वेतन आयोग त्रुटी दूर करण्याबाबत निवेदन त्यांना देण्यात आले.  

यावेळी तालुका अध्यक्ष  एन. टी. मांडगे,  एन. व्ही. पवार, आर. एस. शर्मा, आर. एल. नेटके, ए. यु. गांगर्डे आदी उपस्थित होते. 

सभापती शिंदे यांनी शासकीय निमशासकीय संघाच्या पदाधिकार्यांकडून सर्व प्रश्न समजून घेत. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post