नगर ः लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दक्षिण अहमदनगर लोकसभा -37 चे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना बहुमताने निवडून आणण्याच्या दृष्टीने संभाजी ब्रिगेडची प्रचार यंत्रणा सक्रिय सहभागी झाली असून नियोजपूर्वक प्रचार चालू आहे यादरम्यान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांना देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वासर्वे शरद पवार यांनी भेटी साठी बोलावले असता संभाजी ब्रिगेडचे शिष्टमंडळ पवारांना भेटले यावेळी विविध विषयावर चर्चा केली.
संभाजी ब्रिगेडचे नगर जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या बरोबर चर्चा करुन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडणुकीत भरघोस मतांनी निवडुन आणण्यासाठी यासाठी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील ब्रिगेडच्या शिष्टमंडळाला शरद पवार यांनी भेट साठी बोलावले होते
या भेटीनंतर परकाळे म्हणाले की, आजच्या हुकूमशाहीला, दहशतीला पराभूत करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते घरोघर जाऊन संविधान वाचविण्यासाठी महविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार करणार आहेत. भविष्यात महायुतीच्या कोणत्याही जुमल्यांना मतदारांनी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. सध्याचे सरकार खोके सरकार व जुमलेबाज सरकार असल्याची टिका देखील त्यांनी केली. आता खोटी आश्वासन नको.
जिल्ह्यात व शहरात चांगले शिक्षण, आरोग्य, रस्ते, रोजगार, वीज सुविधा मिळाल्या पाहिजेत. शेतमालाला, दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे, देशाचे संविधान सध्या धोक्यात आले आहे यासाठी हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा घरोघर जाऊन प्रचार करुन त्यांना जास्ती जास्त मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
लंके हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. एक साधा माणूस आहे. सर्वसामान्यांचे दुःख दूर करणे, विकासाची दृष्टी ठेवून काम करणे, गरजवंताच्या हाकेला धावून जाणं यामुळेच नगर जिल्हया सह त्यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने अल्पावधीत भरभरून प्रेम दिल. लंके यांचे खासदार होणं म्हणजे सर्व मतदारांनी खासदार होणं असं असल्याचे मत परकाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, महानगर कार्याध्यक्ष अच्युत गाडे, जिल्हा कर्याध्यक्ष शरद जोशी, जिल्हा महासचिव निलेश बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन काकडे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजि. शाम जरे, पारनेर तालुकाध्यक्ष सुदाम कोरडे, पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ राहुल देशमुख, कर्जत तालुकाध्यक्ष दत्ता भोसले, शेवगाव तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायके, श्रीगोंदा उपाध्यक्ष दिलीप लबडे, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल (बंटी) भिंगारदिवे, श्रीगोंदा शहराध्यक्ष विनोद मेहत्रे, नगरतालुका कार्याध्यक्ष अवी मेढे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार यांच्या बरोबर चर्चा करताना राजेश परकाळे यांनी लोकशाही, संविधान व देश वाचवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी व राज्य पातळीवर महाविकास आघाडी निर्माण करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलल्या बद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने शरद पवार यांना प्रबोधनकार ठाकरे लिखीत देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे पुस्तक, महात्मा फुले यांचे शेतकर्यांचा असुड, गुलामगिरी, तर पुरुषोत्तम खेडेकर लिखीत शिवचरित्र व् बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास आदी पुस्तके भेट देऊन सत्कार केला.
Post a Comment