नगर : राज्यात लोकसभा मतदारसंघापेक्षा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरशीची व अतितटीची होणार आहे. मागील निवडणूक अतितटी झाली झाली असती परंतु काहींनी विरोधकांशी हात मिळवणी करून आपला स्वार्थ साधून घेतल्याने संग्राम जगताप यांचा पराभव झालेला आहे. मात्र आताची लढत चुरशीची होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असून महायुती व महाविकास आघाडी यांनी ही लढत प्रतिष्ठेची केलेली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नीलेश लंके यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा रंगणार आहे. या लढतीत पवार कुटुंबाची ताकद विभागलेली असून उपमुख्यंत्री अजित पवार यावेळी विखेंच्या बाजूला असणार आहेत.
शरद पवार यांच्याशी ही निवडणूक तशी प्रतिष्ठेची ठरणार आहे. तशीच विखे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होणार आहे. लंके विरुध्द विखे यांच्यातील ही लढत पवार विरुध्द पवार होणार असून कोणीही विजयी झाले तरी पवार गटाचेच वर्चस्व या मतदार संघात राहणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सुरु आहे. परंतु शरद पवार या वेळी विखेंसह अजित पवार यांना चारीमुंड्या चित करतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल काही दिवसच बाकी आहे. त्यानंतर खन्य अर्थाने लढत रंगणार आहे. असे असेल तरी लोकसभा निवडणुकीचे वारे गेल्या वर्षभरापासूनच वाहू लागले आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांच्याविरोधात आमदार लंके शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्यांच्यापुढे पक्षीय उमेदवारीची अडणच निर्माण झाली.
जागा वाटपात बदल झालेला आहे. त्यामुळे लंके यांना अजित पवार गटात सहभागी होण्याची ेळ आलेली आहे. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्यावर पक्षातंर बंदी कायद्याने कारवाईचा इशारा दिल्याने उघडपणे आणि तातडीने निर्णय टाळण्याकडे लंके यांचा कल आहे, ज्येष्ठ नेते पवार यांच्यासोबत त्यांच्या बैठका आणि चर्चा झाल्या आहेत, कायदेशीर सल्लाही घेण्यात आला आहे. दुसरीकडे राजकीय गुगली टाकण्याचे डावपेचही सुरू आहेत. हे काहीही असले तरी आता लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
मागील वेळी विखे पाटील यांना उमेदवारी देण्यावरून ही निवडणूक गाजली होती. मोठा खल आणि चर्चा होऊनही शेवटी विखे यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडूनही उमेवारी देण्यात आली नाही. यामध्ये पवार यांची भूमिका निर्णायक आणि ठाम होती. विखे- पवार कुटुंबातील जुने राजकीय वैर आहे. त्यामुळे अखेर विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीकडून ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांना मैदानात उतरविण्यात आले. त्यावेळी स्वतः पवार यांनी प्रचारात लक्ष घातले होते. ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती. विखे पाटील यांनी ७ लाख, ४ हजार एवढी विक्रमी मते घेत विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी आणलेले उमेदवार संग्राम जगताप यांना ४ लाख, २३ हजार मते मिळाली.
यावर्षी हाच संघर्ष नव्या स्वरूपात पहायला मिळणार आहे. आता राष्ट्रवादीकडून म्हणजे पवार यांच्याकडून लंके मैदानात येत आहेत. त्यावेळी जगताप यांचे विखे पाटील यांच्याशी थेट वैर नव्हते, त्यांनी शहराबाहेर फारसा संपर्कही केलेला नव्हता. आता मात्र लंके यांचे विखे यांच्याशी राजकीय वैर निर्माण झालेले आहे. त्यामुळे विखे यांना ही निवडणूक तशी सोपी वाटत नाही. त्यामुळे त्यांनी शहरासह ग्रामीण भागात जास्त संपर्क वाढविलेला आहे. ग्रामीण भागात लंके यांचे पारडे जड आहे. त्यांनी आता शहरातही आपला संपर्क वाढविण्यास सरवात झालेली आहे.
लंके तसे मूळचे शिवसेनेचे आहे.आता ते राष्ट्रवादीत येऊन आमदार झालेले आहे. त्यामुळे लंके यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीत चांगलाच संपर्क आहे. या संपर्काच्या जोरावरच ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्याचा फायदा त्यांना निश्चितच होणार आहे. विशेष म्हणे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चार लाख 23 हजार मते मिळाली होती. त्यात वाढ होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
ही निवडणूक लंके यांच्या दृ,ष्टीने सोपी व सरळ राहणार आहे. तसेच भाजपातील नाराज मंडळी विखे यांना संपोर्ट करतील, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. विखे यांनी पाच वर्षात सर्वासमान्यांशी संपर्क न ठेवल्याने त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.
Post a Comment