नगर ः अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एका राजकीय नेत्यापेक्षा त्याचे स्वीय सहायक मोठे झालेले आहे. या स्वीयसहाय्यकांमुळे नेता निवडणुकीत आलेला असूनही त्यांचा खडखडाट अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे नेता मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात नेत्याने चांगली कामे केलेली आहेत. या कामांवर व नेत्याच्या संपर्कावर आता स्वीयसहायक पाणी पेरत आहे. या स्वीय सहाय्यकांमुळे श्रीगोंद्यासह अनेक तालुक्यांमध्ये वादावादी झालेली आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्तेही नाराज झालेले आहेत.
नेत्यापेक्षा या स्वीय सहाय्यकांचाच दरारा मोठा असून ते नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांना जाऊन देत नाही. विशेष म्हणजे नेत्यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्यापासून कार्यकर्ते दूर नेण्याचा प्रयत्न संबंधित करीत आहेत. याबाबत अनेकांनी नेत्याला ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. मात्र त्यांच्याकडूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.
विशेष म्हणजे या स्वीय सहाय्यकांमुळे जुने जानते कार्यकर्ते दूर झालेले आहेत. आणखी काहीजण निवडणुकीच्या धामधूमीत दूर होत आहेत. विशेष म्हणजे नेत्यापेक्षा स्वीय सहाय्यकांचाच रुबाब कार्यकर्त्यांवर रहात आहेत. नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत आहे. मात्र स्वीय सहाय्यकांकडून आरे-कारेची भाषणा केली जात आहे.
पाटीलकीचा तोरा काहीजण करीत आहेत. या पाटीलकीच्या तोर्यात आणखी काहीजण दुखावले जात आहे. चुकीची माहिती पाटीलकीच्या तोऱ्यात नेत्याला दिली जात आहे. त्याचा फटका आगमी काळात नेत्याला बसणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
Post a Comment