नगर : विहिरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता. ९) दुपारच्या सुमारास वाकडी (ता. नेवासा) येथे घडली.
शेतातील विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी सुरुवातीला एक जण गेला. त्याला विहिरीतून वर येता येत नव्हते. म्हणून दुसरा उतरला. तोही बुडाला. त्यानंतर इतर तिघेजण अशाच पध्दतीने विहिरीत उतरले होते.
या विहिरीत स्लरी बनविण्यासाठी गोमूत्र, शेण, डाळिचे पीठ टाकण्यात आलेले होते. त्यामुळे पाण्यात गॅस तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा गॅस नाका तोंडात जाऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले.
Post a Comment