डिप्रेशन"म्हणजेच नैराश्य...

समस्यांबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी आणि कल्याणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी हा दिवस पाळला जातो.


बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक आरोग्य संघटना काम करते यावर्षी आरोग्य दिन साजरा करण्यासाठी "डिप्रेशन"म्हणजेच नैराश्य.

निराशातून जाणारा माणूस आत्महत्येच्या वाटेवर जातो त्यामुळे हा विकार आपण अधिक गांभीर्याने घेतला गेला पाहिजे.

वास्तविकता बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे त्याचाच हा परिणाम दिसून येत आहे.

सतत एकाकी राहणे, जेवण न करणे किंवा खूप जेवण करणे, चिडचिड करणे, त्रागा करणे ,विचार मग्न व अबोल राहणे ,आरोग्याकडे लक्ष न देणे ,चिंताग्रस्त राहणे ,ही आणि इतर नैराश्याची लक्षणे आहेत.

निराशा हे मानाचा विचार आणि जीवनशैलीशी निगडित असले तरीही त्यासाठी या जागतिक दिनानिमित्त आपण सर्वांनी बदल करण्यास सुरुवात करायला हवी. आपल्या देशाची संपूर्ण जगभरात पहिली ओळख म्हणजे भारत देश हा योग आणि अध्यात्माशी जोडला केलेला आहे. 


अध्यात्मातून मनात आलेले निराश जनक नकारात्मक विचार दूर होतातच शिवाय एक सकारात्मक आणि एकाग्रतेची ऊर्जा आपल्याला नक्कीच मिळते.

खरे पाहता बदल हा व्यक्तीच्या विचारात आणि आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात येण्याची गरज असते. कारण मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर आणि तेव्हाच शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिले जाते.

या सर्वांसाठी उपाय म्हणजे नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदल करायला हवा, आत्मविश्वास मिळवा, इतरांशी सकारात्मक संवाद साधा, दैनंदिन जीवनात नियंत्रणाची भावना विकसित करा, तणाव अधिक प्रभावीपणे हाताळा, या सगळ्यांबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज न चुकता व्यायाम, ध्यानधारणा, प्राणायाम तसेच योग्य त्या आहार तज्ञांच्या सल्ल्याने संतुलित , सकस व प्रमाणबद्ध आहाराचा समावेश असावा.

रोजच्या आहारामध्ये सुकामेवा , प्रमाणामध्ये पाणी ,हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या ,दूध व दुधाचे पदार्थ ,कडधान्य ,डाळी, प्रोबायोटिक्सयुक्त आहार म्हणजेच दही ,इडली, डोसा इत्यादी. यांचा समावेश असावा.

समतोल आहार मध्ये कर्बोदके ,प्रथिने ,तसेच चांगल्या प्रकारचे फॅट यांचा प्रमाणबद्धतेने समावेश असावा.

या सगळ्यांसोबतच टेक्निकल गोष्टींचा गरजे व्यतिरिक्त अतिवापर टाळावा जसे की मोबाईल ,लॅपटॉप इत्यादी, शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करावी, लवकर निजे आणि लवकर उठे याचा अवलंब करणे, सकाळी मोकळ्या हवेत ऑक्सिजन जास्त आणि ओझोन लेअर कमी असताना फिरण्यासाठी अथवा व्यायामासाठी जावे.तसेच साधे, पारंपारिक आणि ताजे शिजवलेल्या अण्णांचा आहारात समावेश असावा.

स्वतःसाठी वेळ द्यावा, एखादा तरी चांगला छंद जोपासावा, खाल्ल्यानंतर शतपावली करावी, सकाळी नित्य नियमाने नाश्ता करणे, सूर्य मध्यानला आलेला असताना दुपारचे जेवण आणि सूर्यास्तानंतर रात्रीचे जेवण घेणे हे योग्य ठरते.

नुकताच पार पाडण्यात आलेला जागतिक आरोग्य दिन निमित्त अशाप्रकारे स्वतःमध्ये व इतरांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली तर नक्कीच तुमचे जीवन हे औषधांविरहितचे आणि फिट, संतुलित राहील.

- माधुरी ठोंबरे,  आहारतज्ज्ञ,  अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post