नगर ः काम केले की दाम मिळतात. मात्र जिल्हा परिषदेत काम करून दामाची चौकशी केल्यानंतर कर्मचाऱ्याकडून अरेरावीची भाषा वापरली जात आहे. काही वेळा तर शिवीगाळ केल्याची घटना घडलेली आहे. याकडे मात्र जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. आम्ही काम करतो. त्या कामाचे दाम घेतो, दामाच्या बदल्या जर अर्वाच्य भाषा वापरली जात असले तर हा प्रकार आता विभागीय आयुक्तांच्या दरबारात मांडला जाईल, अशीच चर्चा आता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु आहे.
जिल्हा परिषदेत वेगवेगळी खाती असून त्यांचा कारभार पहाण्यासाठी वेगवेगळे कारभारी नेमलेले आहेत. या सर्वांचा कारभारी एकच असला तरी त्या कारभार्याच्या कानावर प्रत्येक खात्यात होणारा गैरकारभार पोहचत नसल्याची शोकांतिका अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मुख्य कारभाऱ्याने सर्वच विभागांचा आढावा घेणे अपेक्षीत आहे. मात्र त्यांच्याकडून तसी कुठलीच हालचाल होत नसल्याचे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेतील विविध खात्यातील कर्मचारी नित्यनियमाने कामे करीत आहेत. मात्र या कामाच्या बदल्यात त्यांना मिळणारा मोबदल्याची माहिती घेण्यासाठी संबंधित कर्मचार्यांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. त्यामुळे चारचौघात कर्मचाऱ्यांना अपमान होण्याच्या या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. याकडे आता वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेतील सर्वच कर्मचाऱ्यांची परिस्थिती चांगली आहे, असे नाही. अऩेकांवर कर्जाचा डोंगर आहे. या कर्जाच्या डोंगराचे हप्ते प्रत्येकाचे जात असते. वेळेत पगार झाला नाही तर त्याचा भूर्दंड कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे हा भूर्दंड बसून नये, म्हणून काही कर्मचाऱी महिन्याच्या चार ते पाच तारखेला संबंधित कर्मचाऱ्यांकडे पगार कधी होणार याची विचारणा करीत असतात.
मात्र संबंधिताकडून कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाही, उलट उडावाउडवीचे उत्तरे देऊन कर्मचार्यांना अवमान केल्याच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोणी पगाराची माहिती विचारली तर आता शिविगाळीचा प्रकार जिल्हा परिषदेत सुरु झालेला अशी चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. हा प्रकार थांबणे गरजेचे असे मत आता कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे. कर्मचाऱ्यांशीच अरेरावी करणाऱ्या कर्मचार्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Post a Comment