कविता स्पर्धेला राज्याबरोबरच परराज्यातून प्रतिसाद... शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानची माहिती...

नाशिक ः शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान पिंपळगाव जलाल (ता. येवला, जि. नाशिक) आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेला राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून आणि परदेशातील कवींकडून प्रतिसाद लाभला आहे,  अशी माहिती  शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे.


या कविता स्पर्धेत राज्यासह परराज्यातून सुमारे २५० कविता पुरस्कारासाठी परिक्षणार्थ प्राप्त झाल्या. हा आमच्यावर टाकलेला विश्वास आणि स्नेह वृद्धिंगत झाल्याची पावती आहे.  या सर्व कविता परिक्षकांकडे दि २६ जानेवारी२०२४ च्या मुहुर्तावर परिक्षणार्थ सुपुर्द केल्या आहेत. या परीक्षकांना स्पर्धेचा निकाल १ मे २०२४ रोजी देण्यात येणार आहे. त्यानंतर तो जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post