पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे...

मुंबई ः आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष व चिन्ह जरी बळकावले असले तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी यांनी दिली आहे.


निवडणूक आयोगाच्या निकालावर रोहित पवारांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले की, 'केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. 

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणे, मुंबईचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणे, असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची पात्रता कळते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post