पुणे ः ढगाळ वातावरणामुळे मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिल्ली, हरियाणा, पंजाब, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम येथे अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
ढगाळ वातावरणामुळे मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. उर्वरित भागात थंडी कायम राहिल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
Post a Comment