मुंबई ः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गट उद्या सुप्रीम कोर्टात जाणार आहे. शरद पवार गट उद्या सकाळी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिका दाखल करणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ चिन्ह देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने याबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवीन नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयाविरोधात आता शरद पवार गट आता न्यायालयात जाणार आहे. आता न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment