श्रीगोंदा ः तालुक्यातील लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर विकासकामांवरून झालेल्या शाब्दिक चकमकीतून दोन गटांमध्ये थेट ग्रामसभेत मारामारी झाल्याची घटना सोमवार (ता. पाच) रोजी घडली आहे.
लिंपणगाव येथे सोमवारी सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू होती. त्याच दरम्यान, सिद्धेश्वर मंदिर विकासकामांचा विषय पुढे आला. त्यातून सत्ताधारी व तक्रारदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाले.
सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण व अन्य कामांसाठी जवळपास तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. काही कामेही सुरू झाली होती. मात्र, या कामांचा दर्जा व काही तांत्रिक त्रुटीबद्दल चुकीच्या तक्रारी करण्यात आल्यामुळे ही कामे बंद पडून सगळा निधी माघारी गेल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे.
पुरातत्व खात्याची परवानगी न घेता ही कामे सुरू केल्याचा व ती दर्जाहीन असल्याचा तक्रारदारांचा आक्षेप होता. सिद्धेश्वर मंदिराच्या कामावरून गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत वाद धुमसत आहे. आज त्यातून थेट ग्रामसभेत मारामारी झाली,
Post a Comment