नागपूर ः मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासणे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सूपुत्र, काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अंगलट आले आहे.
नागपूर जिल्हा परिषदेसमोर लावण्यात आलेल्या विकसित भारत या मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासणे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना महागात पडले आहे. कुणाल राऊत यांनी या जाहिरातीवर संताप व्यक्त करत काळे फासले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुणा राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत जाऊन 'मोदी की गॅरंटी' या आशयाच्या बॅनरवर काळे फासले होते. तसेच त्यांनी बॅनरवरील मोदी या शब्दावर दुसरे स्टिकर्स लावले होते.
या प्रकरणी पोलिसांनी कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासून बेपत्ता होते. त्यानंतर आज कुणाल राऊत यांना रविवारी सायंकाळी कुहीमधून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
Post a Comment