दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दिलेल्यांमध्ये नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा समावेश...

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींचा दोन्ही गटांना पाठिंबा आहे. या लोकप्रतिनिधींकडून निवडणूक आयोगात दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे या मुद्द्याचा विचार आता राष्ट्रवादीच्या पुढच्या न्यायालयीन लढ्यासाठी देखील महत्त्वाचा असण्याची शक्यता आहे. 


निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह बहाल केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाची ऑर्डरदेखील समोर आली आहे. 

विधीमंडळातील संख्याबळाच्या आधारावर हा निकाल देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ट्विस्ट आणणारा एक महत्त्वाची गोष्ट देखील या निकालात समोर आली असल्याची सध्या दोनही गटात चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींचा दोन्ही गटांना पाठिंबा आहे. या लोकप्रतिनिधींकडून निवडणूक आयोगात दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे या मुद्द्याचा विचार आता राष्ट्रवादीच्या पुढच्या न्यायालयीन लढ्यासाठी देखील महत्त्वाचा असण्याची शक्यता आहे.

यामध्ये एक खासदार व पाच आमदारांचा समावेश आहे. यातील आमदारांमध्ये नगर जिल्ह्यातील आमदारांचा समावेश असल्याची चर्चा शरद पवार व अजित पवार गटात सुरु आहे. परंतु ते आमदार कोणते, अशी चर्चा हा निकाल आल्यापासून सुरु झालेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post