मुंबई : नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार, असे तीन पर्याय शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दिला आहे. याचसोबत वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे जाईल हे गृहित धरून शरद पवारांनी तीन महिन्यांपूर्वीच मी राष्ट्रवादी आणि उगवता सूर्य हे चिन्ह याबाबतची तयारी करून ठेवली होती. निवडणूक आयोगाकडे 120 चिन्ह शिल्लक होती, त्यातलं कुठलं चिन्ह घ्यावं यासंदर्भात शरद पवार गटात खल झाला.
Post a Comment