सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देण्यासाठी कोट्यावधी रुपये माझ्याकडे मागण्यात आले होते. परंतु मी "कमिटमेंट" पूर्ण करण्यासाठी कमी पडलो. त्यामुळे मला डावलण्यात आलं. तरीही तब्बल एक कोटी रुपये मी त्यांना चेकच्या माध्यमातून दिले. तशा प्रकारचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला.
पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती.
त्याला त्यांनी सावंतवाडीत येऊन प्रत्युत्तर दिले. माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे.
दरम्यान, तब्बल दोन महिने मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर वाट बघत होतो. परंतु मला भेट देण्यात आली नाही. कॅबिनेट मंत्री पदासाठी माझे नाव चर्चेत असताना मला राज्यमंत्रीपद देण्यात आले. तरी मी गप्प राहिलो. मग मी गद्दार कसा? मला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल केसरकर यांनी केला आहे.
Post a Comment