राष्ट्रवादी पक्ष-चिन्ह अजित पवारांचा ; निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई ः महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात येत असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे निवडूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्षाला आता नवीन नाव आणि चिन्ह देण्यात येईल. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post