वडनेर : पारनेर तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा पानोली शाळेची विद्यार्थीनी कु.स्वरा रामदास चौरे हिने तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत बालगटात कथा/गोष्ट सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तिची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
जि.प.प्राथमिक शाळा पानोली ही महाराष्ट्र राज्यामधे अत्याधुनिक संगणकिय तसेच उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.स्वरा ला शाळेचे मुख्याध्यापक रमजान शेख,शिक्षक रामदास चौरे, काशिनाथ खेडकर,मारूती पवार,छाया मापारी,कमल नरसाळे संगिता लोंढे,पालक प्रिया चौरे यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सीमाताई राणे ,विस्तार अधिकारी रावजी केसकर,विनय लाळगे केंद्रप्रमुख मंदा साबळे यांनी अभिनंदन केले.
शाळा व्य.समिती अध्यक्ष रामदास थोरात उपाध्यक्ष भानुदास शिंदे,सरपंच मोहिनीताई भगत,उपसरपंच प्रशांत साळवे, ग्रा.पं.सदस्य संदीपशेठ गाडेकर,मा.सरपंच शिवाजी शिंदे, ऐक्य सेवा सेंटर पानोली संस्थापक तुकाराम वाखारे,डाॕ.रामचंद्र थोरात,संजय भगत,दादाभाऊ वारे,संजय काळोखे ,हरीभाऊ गायकवाड,राजूशेठ गायकवाड,आबासाहेब गायकवाड ,पानोली ग्रामस्थांनी स्वराचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Post a Comment