मुख्याध्यापकाकडून शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला धमकी...

शेवगाव ः मुख्याध्यापकाकडून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यास व्हॉट्सअॅपवरून जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे.  ही घटना शेवगाव तालुक्यात घटना घडली आहे. 


याबाबत बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर आसाराम गाडेकर (वय ४५) यांनी रविवारी (ता. २८) छावणी पोलिस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे राक्षी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पोपट दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.

डॉ. शंकर गाडेकर यांनी राक्षी शाळेस भेटी दरम्यान, मुख्याध्यापक पोपट सूर्यवंशी यांच्या गैरहजेरीबाबत अहवाल तयार केला. त्यामुळे सूर्यवंशी यांनी तक्रार केल्याच्या रागातून शनिवारी (ता. २७) रात्री डॉ. गाडेकर यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअॅपवर सातमेसेज पाठविले. 

यामध्ये प्रथम राहुरीतील वकील दाम्पत्यांच्या निर्घृण खुनाच्या बातमीची, लिंक पाठवून रिड केअरफुली, काळजी घ्या व ओव्हरटेक करणार आहात का? तर करा पण अॅक्सिडेंट झालाच तर? असे खळबळजनक मेसेज पाठवून ‘वळवळ झालीच तर सल्ला नाही पण विनम्र होऊन सांगेल, मेसेज सूर्यवंशीचा आहे, असे म्हटले आहे. याबाबतची तक्रार गाडेकर यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post