थकबाकीदारांची नावे लटकवली वेशीवर...

नगर : मालमत्ता कर न भरणारे थकबाकीदार आता महापालिका प्रशासनाच्या रडारवर आहेत. शहरात जागोजागी थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावण्यात आले आहेत. फलक पाहूनही थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे.


शहरातील मालमत्ताधारकांनी महापालिकेचा तब्बल २१३ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. ही थकबाकी वसूल करताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनव आले आहेत. 

थकबाकीदारांना दिलासा देऊन जास्तीत जास्त वसुली व्हावी, या उद्देशाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी काही दिवसांपूर्वी शंभर व त्यानंतर ७५ टक्के शास्ती माफ केली होती. मात्र, बहुतांश थकबाकीदारांनी या सवलतीकडे दुर्लक्ष केले.

महापालिकेने थकबाकीदारांची नावे फलक करून लावणे चुकीचे आहे. थकबाकी भरल्यानंतर संबंधितांची झालेलीे बेअब्रु झालेली भरून देनार का असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. याबाबत काही जण न्यायालयीन लढाई करण्याच्या तयारीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post