शंकरराव गडाख शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार...

नगर : विधानसभेला अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठींबा देत राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सामिल झालेले व पुढे शिवबंधनात अडकलेले नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवबंधनाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.


शंकरराव गडाख यांना मंत्रीपद आणि जिल्ह्यातील शिवसेनेची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी कायम आपल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत केले. जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा अथवा आमदार-खासदार यांचा रोष त्यांनी ओढवून घेतला नाही. 

राज्यासह देशातील एकूणच बदललेले राजकारण आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका समजावून घेण्याच्या अनुषंगाने आ. गडाख यांनी निवडक समर्थकांसोबत बैठकांचा सपाटा लावला आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी जवळीक आणि त्यामाध्यमातून मतदारसंघाला होणारा फायदा याची गोळाबेरीज पाहता आ. गडाख काही दिवसातच भाजपात दाखल झाल्यास आश्चर्य वाटू नये. गडाख यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची नगर जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे. परंतु गडाख भाजपमध्ये आल्याने तालुक्यात नाराजी वाढणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post