नगर ः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरकारला एक प्रकारची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते निवडणुका घेत नाही. त्यांना आपल्याला यश मिळेल, असे वाटत नाही. म्हणून ते निवडणुका पुढे ढकलत असावेत , असा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे.
विरोधी पक्ष नेतेत जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले की, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था परिस्थिती गंभीर झालेली आहे. परदेशात मुलींना फसवून नेले जाते. राज्यांमध्ये अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहेत. श्रीरामपूर येथील घटना सुद्धा ताजी आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न राज्यामध्ये गंभीर झालेला असतानाच आज पोलीस अधिकाऱ्यांना मोकळीक दिली जात नाही. वेळीच याकडे लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
कसबा व चिंचवडच्या निवडणुका पाहता या सत्ताधाऱ्यांना जनतेने नाकारल आहे. ही वस्तुस्थिती आहे. राज्यामध्ये भाजप व शिंदे गटाची झालेली युती ही जनतेला पटलेली नाही, असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी उभी केलेली शिवसेना आहे. त्याचे पक्ष चिन्ह व नाव हे दुसऱ्यांना दिले, हे सुद्धा जनतेला आवडलेले नाही.
पवार म्हणाले की, खेड येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जोरदार सभा झाली आहे. या ठिकाणी पूर्वीचे शिवसेनेचे संजय कदम यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या अगोदर ते त्याच पक्षामध्ये होते. मागील वर्षीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता. आमचाच तो उमेदवार हा आता मूळ शिवसेनेकडे गेला आहे.
आज विरोधक राष्ट्रवादी पक्षाने तेथे गर्दी जमवली, असे सांगतात. हे अतिशय चुकीचे आहे. उलट आमचाच माणूस तिथे जातो, मग आम्ही कशाला गर्दी करू? असे म्हणत विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Post a Comment