जल्लोष घुले यांच्या नावाचा अन् गुलाल कर्डिलेच्या जयघोषाने उधळला...

नगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या.  माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नावाचा जल्लोष करण्यात आला. पण अखेर अध्यक्षपदाचा गुलाल माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अंगावर पडला.


जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या.  या निवडणुकीत चांगलेच चुरस निर्माण झाली होती. दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक अर्ज भरण्याची मुदत होती. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अर्ज दाखल केला होता. 

शेवटच्या क्षणापर्यंत दुसरा अर्ज येत नसल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चंद्रशेखर घुले हे निवडून आल्याचा जल्लोष सुरू केला होता. शेवगावमध्ये काही ठिकाणी फटाकेही वाजविण्यात आले.

मात्र शेवटच्या क्षणी भाजपच्या वतीने माजी मंत्री माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी अर्ज दाखल करून या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली. दोन अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान घेतले. 

या मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना नऊ मते मिळाली तर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना दहा मते पडले तर एक मतदार तटस्थ राहिल्याने या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

नेमकी कोणाची मते फुटली याविषषी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. घुले यांचे नाव फायनल झाल्यामुळे नाराज झालेल्यांनी तर धोका दिला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निवडीनंतर आमदार मोनिका राजळे व खासदार डॉ. सुजय विखे यांनी बँकेत कर्डेिले यांचा सत्कार केला.

जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाली. अजित पवार यांना नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा दणका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post