उपक्रमशील शिक्षिका दीपाली बोलके यांना शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जिल्हास्तरीय पुरस्कार जाहिर

नगर : महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थाना राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. 


यामध्ये राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील उपक्रमशिल शिक्षिका तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.दीपाली राजेंद्र बोलके ( पुराणिक ) यांना राज्य शासनाचा जिल्हास्तरावरील पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन १९९६-९७ पासून देण्यात येत आहे.

सन २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ , २०१८-१९ व २०१९-२० या वर्षाचे राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारार्थीची निवड करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत .

राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील उपक्रमशिल शिक्षिका तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दीपाली राजेंद्र बोलके  (पुराणिक )यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची राज्य शासनाने दखल घेऊन जिल्हास्तरावरील  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार घोषित केला आहे. 

या पुरस्कारामध्ये रोख रक्कम , मानपत्र व प्रमाणपत्र देऊन लवकरच या पुरस्काराचे मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मा महिला बालकल्याण व समाजकल्याण मंत्री यांचे उपस्थितीत शानदार कार्यक्रमात वितरण होणार आहे.

या पुरस्काराबद्दल दीपाली राजेंद्र बोलके ( पुराणिक ) यांचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस तथा शिक्षक बँकेचे संचालक कल्याण लवांडे  ,संघाचे राज्यसंघटक  तथा जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त राजेंद्र निमसे, संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे माजी संचालक बाळासाहेब कदम ,जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे , जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत बांगर , जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले , जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर , संजय शेळके ,विष्णू चौधरी , प्रदीप चक्रनारायण, रज्जाक सय्यद  ,भाऊसाहेब घोरपडे , सुधीर रणदिवे , संदीप शेळके , विलास लवांडे , लाजरस कसोटे ,बजरंग बांदल , पांडुरंग देवकर , प्रविण शेळके ,अशोक दहिफळे , संजय कांबळे , विनायक गोरे , विशाल कुलट, रविंद्र दरेकर , राजेंद्र गांगर्डे , आदिल शेख, आदिनाथ पोटे , महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके , शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे , महेमुदा सय्यद ,संगीता निगळे , उज्वला घोरपडे , सुरेखा बळीद,मनिषा गोसावी , शितल ससे , सीमा गावडे आदींनी अभिनंदन केले आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post