नगर : संजय राऊत कोंबड्याप्रमाणे आपल्या मालकाला रोज उठून खुश करत असतात. अशा नोकर मानसावर काय प्रतिक्रिया द्यावी, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
राहुरी येथील जनता दरबारानंतर महसूलमंत्री विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. विखे म्हणाले की, खासदार संजय राऊत हे अदखल पात्र आहे. त्यांची राज्यातील जनताही दखल घेत नाही. तो नोकर मानूस आहे, त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असे ते म्हणाले.
विखे म्हणाले की, तुम्ही शक्ती प्रदर्शन करताय तो प्रत्येक राजकीय पक्षाचा भाग आहे. त्यांच्या भाषणात मला एक आश्चर्य वाटले की संधी साधू लोक बाहेर गेली आहेत. ज्यांनी भारतीय पक्षासोबत निवडणूक लढवल्या.
मात्र सत्तेसाठी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली तो संधी साधूपणा नाही का ? ते अशी टीका विखे यांनी केली. ते स्वतःच स्वतःवर शिंपीडे उडून घेतात. हे कुठेतरी शिवसेनेने थांबवले पाहिजे असे विखे म्हणाले.
Post a Comment