पारनेरमध्ये जनावरे चारणार्यावर बिबट्याचा हल्ला....

पारनेर : पानोली येथे पवळदरा परिसरात मोहन पवार  (वय ६५) या  वृद्ध शेतकरी आज (ता. सहा) सकाळी दहा वाजेच्या सुमारास जनावरे चारावयास गेले असता बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. 


या वेळी  त्याचा प्रतिकार  मोहन पवार व सचिन पवार यांनी केला. बिबट्याला काठीने मारण्याचा प्रयत्न केला. परंतु या हल्ल्यात मोहन पवार हे गंभीर जखमी झाले. 

पवार यांना  प्राथमिक उपचारासाठी पारनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही पवळदरा, सिद्धेश्वरवाडी , गाडेकर मळा, माळवाडी वडुले रस्ता येथे अनेक वेळेस बिबट्याचे दर्शन झालेले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post