नाशिक : प्रहारचे प्रमुख तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकारणात दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
२०१७ साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. त्यावेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना धमाकवने व मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
याप्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती. यानंतर आज याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
निकालानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment