पारनेर : केंद्र सरकारने जशी चित्त्यांची आयात केली तशी बिबट्यांची निर्यात करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे अशी मागणी केली आहे.
पवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाढती वृक्षतोड व नष्ट होत चाललेली जंगले यामुळे वन्य प्राण्यांसोबत वन्य हिंस्त्र पशुही पाण्यासोबत भक्ष्याच्या शोधात मनुष्य वस्तीमध्ये येत आहे. पानोलीमध्ये हिंस्त्र नरभक्षक बिबट्याकडून पानोलीत माणसावर झालेला हल्ला गंभीर आहे.
परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वाढता वावर अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे काही अघटीत घटना घडू नये यासाठी वनविभाने तातडीने बिबट्या सदृश्य भागात तातडीने पिंजरे लावायला हवेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे केली आहे.
पारनेर तालुक्यातील पानोली गावासह राळेगणसिद्धी परिसरामध्ये बिबट्यासह हिंस्त्र प्राण्यांचे वाढते प्रमाण अत्यंत धोकादायक आहे. त्यातच नरभक्षक पशूकडून झालेला हल्ला व परिसरातील नागरिकांना पानोली राळेगणसिद्धी रोडवर नरभक्षक बिबट्यासह हिंस्त्र पशु आढळल्याने परिसरातील नागरिक घाबरून गेले आहे.
नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वनीकरणसह प्रशासणाणे परिस्थितीला गांभिर्याने घेत तातडीने परिसरात पिंजरे लावून हिंस्त्र पशुना पिंजरर्याच्या माध्यमातून पकडण्यात येवून त्यांना जंगलात सोडण्यात यायला हवे त्याचबरोबर सरकारने ज्या प्रमाणे विदेशातून चित्ते विकत आणले.
त्याप्रमाणे देशातील बिबटे परदेशात विकल्यास आर्थिक बरोबर नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मिटून निसर्गाच संरक्षण साधता येईल. ग्रामीण भागात नरभक्षक बिबट्यांचे वाढते. प्रमाण चिंताजनक आहे.
त्यामुळे बिबट्या सदृश्य भागात नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी जागरूक राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोगत व्यक्त केले.
Post a Comment