नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाचे नाव विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आज मंगळवारी ठरवणार आहेत.
अजित पवार आज नगर दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांनी निश्चित केलेल्या नावावर शिक्कामोर्तब होत बँकेचे संचालक मंडळ बुधवारी नव्या अध्यक्षाची निवड करणार आहे.
दरम्यान बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमध्ये देखील चांगलीच स्पर्धा निर्माण झाली असून शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर व श्रीगोंद्याचे युवा नेते आणि माजी आमदार राहुल जगताप अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
घुले, गायकवाड, जगताप, गायकर यांच्या ऐवजी आता आमदार मोनिका राजळे व माजी सभापती अनुराधा नागवडे यांच्या नावाची चर्चा सुरु झालेली आहे. यातून एकजणाची अध्यक्षपदासाठी निवड केली जाणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अध्यक्षपदाची संधी दिली जाणार आहे.
Post a Comment