सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयातील दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण... सर्वोच्चकडून निकाल...

नवी दिल्ली:  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालायतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का याबबत निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. 


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात तीन दिवस चाललेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद आज संपला आहे. सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायालयात शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिवाद झाला. दुपारी जेवणाची सुटी झाली असतानाही न्यायालयाने जेवणाची वेळ पुढे ढकलून सुनावणी सुरू ठेवली. अखेरीस जोरदार घमासान व दावे प्रतिदावे ऐकत अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने हा
 निकाल राखून ठेवला आहे. 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आता न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या राज्यातील पोट निवडणुका सुरु आहेत. त्यांचा निकाल लागल्यानंतर एखाद वेळी न्यालयाचा निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post