मंत्री मंडळाचा विस्तार आता...

नागपूर ः न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. जर नाही झाला तर तो 2024 नंतरच होईल, असेआमदार बच्चू कडू यांनी सांगितले.


शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


कडू म्हणाले की,  
मला दिव्यांग मंत्रयालय दिले त्यामुळे मी नाराज नाही. माझी बंडखोरीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. राज्यपालांच्या शपथविधी साठी पत्रिका छापल्या, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली. अनेक आमदारांना वाटले आपण मंत्री होणार असे वाटू लागले आहे. 

मंत्रीमंडळात 20-30 मंत्र्यांचाच समावेश केला जाईल. मात्र, 100 जण रांगेत आहेत. त्यामुळे नाराजी, कुजबुज सुरू आहे, असे ते म्हणाले. बंडखोरी करणाऱ्यांनाच यश मिळते हा इतिहास आहे. आजपर्यंत ज्यांनी बंडखोरी केली ते मुख्यमंत्री झाले. 

जे निष्ठावंत आहे त्यांच्या पदरी निराशा पडते, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे साहेबांच्याच बाजूने लागेल, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post