मुंबई ः स्वस्तात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने व चांदीच्या भावात घसरण झाली आहे.
जागतिक बाजारात पिवळ्या धातूच्या किंमतीत होत असलेल्या चढउताराने बुधवारी सराफा बाजारात सोने-चांदी दरात घसरण नोंदवण्यात आली होती. आज म्हणजे गुरूवारी सुद्धा दरात मोठी घसरण झाली आहे. सोने विक्रमी उच्चांकावरून तब्बल 3,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
गेल्या महिन्याच्या अखेरीस सोन्याने 58,800 चा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, या महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोने विक्रमी उच्चांकावरून 3,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी 58,800 रुपयांवर असणारे सोने गुरुवारी, 16 फेब्रुवारी रोजी 56,100 च्या पातळीवर आले आहे, म्हणजेच त्याची किंमत 2,700 रुपयांनी खाली आली आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली. गुरूवारी सराफा बाजार उघताच चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, दुपारपर्यंत त्यात घसरण झाली. बुधवारी नाशिकच्या सराफा बाजारात चांदीचा भाव प्रतिकिलो 66 हजार 50 रुपये इतका होता. आज चांदीच्या दरात किलोमागे 250 रुपयांची घसरण झाली असून दर 65 हजार 800 रुपयांवर आले आहेत.
Post a Comment